धुळे : धुळे (Dhule Fire) शहरातील जुन्या महानगरपालिकेच्या जवळ असलेल्या प्रबोधनकार ठाकरे संकुलात असलेल्या प्रियंका स्पोर्ट्स या दुकानाला भीषण आग (Dhule Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमध्ये लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच धुळे महानगरपालिकेच्या अग्निशामक बंबाच्या साह्याने ही आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
काय घडले नेमके?
शहरातील जुन्या महानगरपालिकेजवळ असलेल्या प्रबोधनकार ठाकरे संकुल येथील नामांकित प्रियंका स्पोर्टला काल रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नेमका खरेदीचा हंगाम सुरू असताना ही आग लागल्याने दुकानमालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
या आगीची माहिती मिळताच त्या ठिकाणी महानगरपालिकेचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसोबत इतरही काही नागरिकांनी देखील आग विझविण्यासाठी हातभार लावला. यानंतर अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात यंत्रणांना यश आले. या घटनेमुळे मालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.