CRIME NEWS : शिरूर तालुक्यातील बलात्काराच्या घटनेत भाजप नेत्याचा संबंध नाही ; आरोपी अटकेत , शिक्रापूर पोलिसांचे स्पष्टीकरण

476 0

शिरूर : शिरूर मधील एका फार्म हाऊसवर एका 12 वर्षी अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनें खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसानी कारवाही करत आरोपीला बेड्या ठोकल्यात आहेत. मात्र हा प्रकार भाजप नेत्याच्या फार्म हाऊस घडला त्यामुळे प्रकार दाबण्याचा प्रयत्न पोलीस करत असल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडचे तृप्ती देसाई यांनी केला होता . परंतु या घटनेमध्ये भाजप नेत्याचा कोणताही संबंध नसून संबंधित आरोपीला अटक देखील करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिले आहे.

शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शेती आणि फार्महाऊस कामाला असणा-या शेतमजुरच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील तरुणाने जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशाल गायकवाड असे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-या आरोपीचे नाव असुन आरोपीला शिक्रापुर पोलीसांनी अटक केली.

शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शेती आणि फार्महाऊसवर विशाल गायकवाड आणि पिडित मुलगी यांचे आईवडील वास्तव्य आणि कामासाठी आहे. हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक असुन पिडित मुलीचे आईवडील कामानिमित्ताने बाहेर गेल्यानंतर त्यांच्या नात्यातील नराधमाने हाऊसच्या मागच्या मजुर खोल्यांच्या मागे घेऊन जाऊन जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. या घटनेनंतर शिक्रापुर पोलीसांनी नराधम आरोपीला अटक करण्यात आली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!