अहमदनगरमध्ये बारावी गणिताचा पेपर तासभर आधीच मुलांना वाटला ! नक्की काय घडलं, वाचा सविस्तर
अहमदनगर : अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर येते. अहमदनगर मधील एका महाविद्यालयामध्ये बारावी गणिताचा पेपर हा तासभर आधीच विद्यार्थ्यांना मिळाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे गुन्हे शाखा आता या महाविद्यालयाच्या मालकाचा शोध घेत असल्याचा समजत आहे.
दरम्यान अहमदनगर मधील या महाविद्यालयामध्ये बारावी गणिताचा पेपर हा तासभर आधीच 337 मुलांपैकी 119 मुलांना मिळाला होता. दहा हजार रुपयांना पेपर फुटल्याचं याआधी तपासात समोर आलं होतं. या संदर्भात आता महाविद्यालयाच्या शिक्षकांच्या भूमिकेवर देखील संशय व्यक्त केला जात असून गुन्हे शाखेचे पोलीस अधिक तपास करत आहेत.
