Thane News

Thane News : 13 वर्षीय मुलगी गणेश विसर्जनाला गेली मात्र… दुसऱ्या दिवशी आढळला मृतदेह

531 0

ठाणे : सध्या देशभरात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी (Thane News) पाचव्या दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. याचदरम्यान नालासोपाऱ्यात एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. नालासोपार्‍यातून बेपत्ता असलेल्या 13 वर्षीय मुलीचा मृतदेह निर्मळ येथील खाडीत आढळून आला. खाडीत बुडून तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

काय घडले नेमके?
निर्मळ येथे राहणारी 13 वर्षीय रिया निशाद ही मुलगी शुक्रवारी रात्री घराजवळील गणेशोत्सव मंडळात जागरणासाठी गेली होती. मात्र ती घरी परतली नव्हती. जागरणानंतर ती मैत्रीणीच्या घरी गेली असेल असे तिच्या कुटुंबियांना वाटले. मात्र शनिवारी सकाळी देखील ती घरी आली नव्हती. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली आणि तिचा शोध सुरू केला. दरम्यान शनिवारी संध्याकाळी तिचा मृतदेह निर्मळ येथील एकविरा मंदिराच्या मागे असलेल्या खाडीच्या पाण्यात आढळून आला.

गणेशोत्सव मंडपस्थळापासून खाडी काही अंतरावर आहे. ही मुले तेथे खेळण्यासाठी गेले असताना रिया पाय घसरून पाण्यात पडली आणि तिचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Share This News
error: Content is protected !!