Dombivali Crime

एकीशी लग्न, दुसरीशी साखरपुडा, ‘हनिमून’ मात्र ‘तिसरीशी’

933 0

डोंबिवली : डोंबिवलीमध्ये (Dombivali) एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका नवरदेवाला त्याच्या कारनाम्यामुळे जेलची हवा खावी लागली आहे. हा नवरदेव एकीशी साखरपुडा करुन दुसरीसोबत साता जन्माची गाठ बांधणाच्या तयारीत होता. मात्र पोलिसांना याची खबर मिळाल्यामुळे त्याचा हा प्लॅन पूर्णपणे फसला. ही घटना ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात घडली असून या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी नवरदेवासह त्याच्या आई-वडिलांवरही बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा (Crime) दाखल करत आरोपीला ठोकल्या बेड्या आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
सिद्धार्थ शिंदे (Siddharth Shinde) असे आरोपी नवरदेवाचे नाव आहे. हा आरोपी तरुण चार वर्षांपूर्वी पीडित तरुणीला एका लग्ना दरम्यान भेटला. पीडित मुलीच्या आई वडिलांशी लग्नाची बोलणी करत असल्याचे भासवत त्याने साखरपुडा केला. यानंतर त्याने लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंधसुद्धा ठेवले मात्र यानंतर त्याने तिच्याशी लग्न न करता दुसरीबरोबर लग्न केले.

याची माहिती पीडित तरुणीला मिळताच पीडित तरुणीने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन आरोपी सिद्धार्थ शिंदे याच्या विरोधात तक्रार (Crime) दाखल केली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून सिद्धार्थ शिंदे याला अटक केली तर त्याच्या आई-वडिलांचा शोध सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!