Terrorist Attack

Terrorist Attack : दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला ! नमाज अदा करत असताना निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची हत्या

671 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात रविवारी सकाळी एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची दहशतवाद्यांनी (Terrorist Attack) गोळ्या झाडून हत्या केली. बारामुल्लाच्या शेरी येथील गंटमुल्ला येथे दहशतवाद्यांनी निवृत्त पोलीस अधिकारी मोहम्मद शफी यांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) मोहम्मद शफी हे गंटमुल्ला भागातील मशिदीत नमाज अदा करत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात नाकाबंदी करण्यात आली आहे. मोहम्मद शफी मशिदीत अजान देत असताना या दहशतवाद्यांनी हे भ्याड कृत्य केले आणि त्यांची गोळ्या घालून हत्या केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या दहशतवादी हल्ल्यानंतर लगेचच सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनीही याबाबत ट्विट करून लोकांना या भागापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

WFI : केंद्र सरकारकडून भारतीय कुस्ती संघाचे निलंबन

Ajay Devgan : ‘सिंघम 3’ च्या सेटवर अजय देवगणचा अपघात; दुखापतीमुळं चित्रपटाचं शूटिंग कॅन्सल

Accident News : भीषण अपघात ! रिक्षाला पाठीमागून भरधाव कारने धडक दिल्याने तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबद्दल क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली, 24 जानेवारीला होणार सुनावणी

Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव ! ‘या’ ठिकाणी आढळला कोरोनाचा रुग्ण

Jammu – Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये मोठी चकमक; 4 पाकिस्तानी दहशतवाद्यांना धाडलं कंठस्थानी

Sushma Andhare : ‘तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल पण माफी मागणार नाही’, सुषमा अंधारेनी नीलम गोऱ्हेंना लिहिले पत्र

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!