Accident Video

Accident Video : महामार्गावरील उभ्या ट्रकला भरधाव कारची धडक; 6 जणांचा जागीच मृत्यू

10279 0

सध्या सोशल मीडियावर तामिळनाडूतील ट्रक आणि कारच्या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल (Accident Video) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हा भीषण अपघात तामिळनाडूतील सेलम या ठिकाणी पहाटेच्या सुमारास घडला आहे. या अपघाताचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक भरधाव वेगात आलेली कार महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडकल्याचं दिसत आहे. कारने ट्रकला एवढ्या जोरात धडक दिली आहे की, या धडकेत कारमधील सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. पहाटे चारच्या सुमारास झालेल्या हा भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

काय घडले नेमके?
तामिळनाडूतील येंगूर येथील एका कुटुंबातील आठ जण कारमधून पेरुनथुराईला निघाले होते. सेलम-इरोड महामार्गावर पहाटे 4 वाजता कार भरधाव वेगात जात होती. यावेळी ती महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या एका ट्रकला मागून धडकली. कारचा वेग एवढा होता ती थेट ट्रकच्या खाली घुसल्याच दिसत आहे. या अपघातामध्ये कारमधील आठ जणांपैकी सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे.

https://twitter.com/PTI_News/status/1699277193216421972

तर कारमधील दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!