Tamil Nadu Fire News

Tamil Nadu Fire News : तामिळनाडू ट्रेनला भीषण आग! 8 ठार तर 20 जण जखमी

584 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तामिळनाडूच्या (Tamil Nadu Fire News) मदुराई येथे ट्रेनला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. लखनऊ- रामेश्वर या ट्रेनला (Tamil Nadu Fire News) ही भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये 8 जण ठार झाले असून 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रेनमधून गॅस सिंलेंडरची तस्करी केली जात असल्यामुळे आग लागल्याचे समजत आहे. तामिळनाडूतील मदुराई रेल्वे स्थानकावर आज सकाळी ही भीषण दुर्घटना घडली आहे.

या भीषण दुर्घटनेत जीव गमावलेले 8 जण हे उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. आग लागलेल्या डब्यात एकूण 55 प्रवासी होते, असे सांगण्यात येत आहे. पुनालूर-मदुराई एक्स्प्रेसमध्ये आज पहाटे 5.15 वाजता मदुराई यार्ड येथे खाजगी डब्यात आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली आहे.

Share This News
error: Content is protected !!