Palghar News

Palghar News : धक्कादायक ! अधीक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

464 0

पालघर : पालघर (Palghar News) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वसईच्या कामन परिसरातील अण्णासाहेब धामणे अनुदानीत आश्रम शाळेत विद्यार्थ्यांला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शाळेत आठवीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याला अधीक्षकाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे.

काय घडले नेमके?
पीडित विद्यार्थी हा अण्णासाहेब धामणे अनुदानीत आश्रम शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेतो. या विद्यार्थ्याला अधीक्षकाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, त्याच्या छातीची बरगडी तुटल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या पालकांकडून करण्यात आला आहे. दरम्यान या मारहाणीनंतर पीडित विद्यार्थ्याला गुपचूप त्याच्या घरी सोडण्यात आले.

निलंबनाची मागणी
नितीन धनजी मागी (वय 14) असे मारहाण करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो डहाणू तालुक्यातील रामपूर (वरठापाडा ) येथील रहिवाशी आहे. तर, पृथ्वी बोरसे असं मारहाण करणाऱ्या अधिक्षकाचं नाव आहे. मारहाणीच्या घटनेमुळे आदिवासी विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या अधिक्षकावर गुन्हा दाखल करून त्याला निलंबित करावे अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!