Dasgupta

धक्कादायक! 29 वर्षीय ‘या’ अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू

2303 0

मुंबई : मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये एका अभिनेत्रीचा अपघाती (accident) मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. सुचंद्रा दासगुप्ता (Suchandra Dasgupta) असे या अभिनेत्रीचे नाव आहे. सुचंद्रा दासगुप्ता या अवघ्या 29 वर्षांच्या होत्या. त्यांच्या अपघाती मृत्यूने इंडस्ट्रीवर मोठी शोककळा पसरली आहे.

काय घडले नेमके?
शनिवारी रात्री शुटिंग आटोपून ही अभिनेत्री आपल्या बाईकने रॅपिडोने पानीहाटी रेल्वे पार्कमधील आपल्या घरी परतत होती. यावेळी बारानगर घोषपाडा रोडजवळ एका दुचाकीने अचानक रस्ता ओलांडला आणि दुचाकीला ब्रेक लागला नाही.अशातच गंभीर अपघात झाला. हा अपघात एवढा गंभीर होता कि यामध्ये अभिनेत्रीचा जागीच मृत्यू (Dead) झाला.

ब्रेक न लागल्याने दुचाकीच्या मागे बसलेली सुचंद्रा खाली पडली. मागून येणाऱ्या एका ट्रकने तिला चिरडले. या प्रकरणी ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे. सुचंद्रा दासगुप्ता या गेल्या नोव्हेंबरमध्ये ‘गौरी इलो’ या मालिकेत सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसल्या होत्या.

Share This News
error: Content is protected !!