Crime

Latur Crime : लातूर हादरलं ! पोटच्या गोळ्यानेच घेतला जन्मदात्या आईचा जीव

547 0

लातूर : लातूरमधून (Latur Crime) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये चक्क एका तरुणाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली आहे. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहरातील बनशेळकी रोड या ठिकाणी हि घटना घडली आहे.

काय घडले नेमके?
प्रॉपर्टीच्या वादावरुन आरोपी सिद्धार्थ बनशेळकिकर याने त्याची आई संगीता बाबासाहेब बनशेळकीकर आणि मोठा भाऊ सचिन बनशेळकीकर यांच्यावर हल्ला केला. त्याने ऊस तोडण्याच्या कोयत्याने त्यांच्या डोक्यात वार केले होते. ही घटना 30 मे रोजी घडली होती. या हल्ल्यात आरोपीची आई आणि भाऊ गंभीर जखमी झाले होते.

आई संगीता बाबासाहेब बनशेळकीकर यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर 1 जूनला रात्री 1 वाजता संगीता बाबासाहेब बनशेळकीकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोटच्या मुलानेच आईची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Porsche Accident Case : अग्रवाल पती – पत्नीला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी

Kolhapur News : मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीची निर्घृणपणे हत्या

Weather Update : आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता ! हवामान विभागाकडून ‘या’ 23 जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

Pune Crime News : पुण्यात पुन्हा ड्रंक अँड ड्राइव्ह ! नवले पुलावर मद्यधुंद डंपर चालकाने महिलेला उडवलं

Share This News
error: Content is protected !!