murder

Hingoli News : हिंगोली हादरलं ! पत्नी नांदायला येत नाही म्हणून जावयाकडून सासूची निर्घृणपणे हत्या

588 0

हिंगोली : हिंगोलीमधून (Hingoli) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका जावयाने चक्क आपल्या सासूची निर्घृणपणे हत्या (Murder) केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातील झेंडा चौक भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. ही हत्या करण्यामागचे कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

काय घडले नेमके?
शेवंताबाई होणाजी वंजे (Shevantabai Honaji Vanje) असे मृत सासूचे नाव आहे तर बाळासाहेब शिनगारे (Balasaheb Shingare) असे आरोपी जावयाचे नाव आहे. पत्नी नांदायला येत नाही या कारणावरून जावयाचे आणि त्याच्या सासूचे जोरदार भांडण झाले. याच रागातून आरोपी जावयाने 75 वर्षीय सासूचे डोके जमिनीवर आपटून तिची निर्घृणपणे हत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच वसमत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी जावयाला ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपी जावयाच्या विरोधात वसमत शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसमत पोलिस (Wasmat Police) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!