सोलापूर : सोलापूरमध्ये (Solapur News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये (Solapur News) डाळिंबाच्या झाडाला फवारणी करताना ट्रॅक्टर ब्लोअरच्या रॉडमध्ये साडीचा पदर अडकला. त्यामुळे गळफास बसून पतीदेखत पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील अजनाळे या ठिकाणी हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. डोळ्यांदेखत पत्नीचा जीव जात असल्याचे पाहून पतीने खूप आरडाओरड केली होती, पण गळफास इतका घट्ट बसला होता की, काही मिनिटात पत्नीने जागेवरच जीव सोडला.
काय घडले नेमके?
प्रियांका प्रवीण येलपले (वय 29 वर्ष, रा. अजनाळे, ता. सांगोला) असे मृत महिलेचे नाव आहे. पती प्रवीण येलपले व पत्नी प्रियांका हे दोघे मिळून रविवारी शेतातील डाळिंब बागेत आले. ट्रॅक्टरला जोडलेल्या ब्लोअर युनिटच्या साहाय्याने डाळिंबाच्या झाडाला फवारणी करत होते. प्रवीण येलपले पुढे बघून ट्रॅक्टर चालवीत होते. पत्नी प्रियंका ट्रॅक्टरला जोडलेल्या ब्लोअर युनिटच्या साहाय्याने झाडांना फवारणी करत होत्या. यादरम्यान ब्लोअर ढवळणी रॉडला प्रियांकाच्या साडीचा पदर गुंडाळून तिला गळफास लागला आणि ट्रॅक्टर जाम चालू लागला. इतक्यात प्रवीण याने पाठीमागे वळून पाहिले असता प्रियांकाच्या गळ्याला साडीचा गळफास बसल्याचे दिसून आले.
गळफास बसल्याने प्रियांकाला ओरडता देखील आले नाही. यादरम्यान ट्रॅक्टर जाम झाल्याने पतीने मागे वळून पाहिले असता पत्नीला गळफास लागल्याचे आढळून आले. प्रवीण यांनी ताबडतोब ट्रॅक्टर थांबवून प्रियंकाच्या गळ्याला बसलेला साडीचा गळफास काढला व उपचाराकरिता तिला तातडीने (Solapur News) सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास सांगोला तालुक्यातील अजनाळे येथे ही घटना घडली. या घटनेमुळे सांगोला तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.