Solapur News

Solapur News : बाप -लेकीच्या नात्याला काळिमा ! मुलीची प्रियकराच्या मदतीने जन्मदात्याला मारहाण; कारण ऐकून बसेल धक्का

972 0

सोलापूर : सोलापूरमधून (Solapur News) बाप – लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये (Solapur News) प्रेमविवाहाला विरोध केला म्ह्णून पोटच्या मुलीनेच बापाला मारहाण केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीसह तिच्या मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही धक्कादायक घटना सोलापूरमधील माढा तालुक्यात घडली आहे.

काय घडले नेमके?
आरोपी मुलीचे नाव साक्षी शाह असे आहे. तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने वडील महेंद्र शाह यांना बेदम मारहाण केली आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. साक्षीचे एका तरुणावर प्रेम होते तिने त्याच्यासोबतच लग्न करण्याचा हट्ट धरला. मात्र, तिच्या आंतरजातीय प्रेमविवाहाला वडिलांचा विरोध होता. याचा राग तिच्या मनात होता. साक्षी कामानिमित्त पुण्याला गेली होती. पुण्यावरून परत येताना वडील तीला शेटफळजवळ घ्यायला गेले होते.

Death of Trekker : हरिशचंद्र गडावर गेलेल्या त्या पर्यटकाचा मृत्यू नेमका कसा झाला? 2 दिवसांनी समोर आलं धक्कादायक कारण

यानंतर शेटफळवरून घरी जात असताना. साक्षीने लघुशंका करण्यासाठी वडाचीवाडी येथे गाडी थांबवली. त्यावेळी तिथे दबा धरून बसलेल्या तिच्या प्रियकराने आपल्या मित्रांच्या मदतीने महेंद्र शहा यांना मारहाण केली. यानंतर साक्षीने पोलीस ठाण्यास फिर्याद दिली आणि वडिलांना रुग्णालयात दाखल केले. यानंतर पोलिसांनी तिच्या वडिलांचा आणि तिचा जबाब घेतला. मात्र पोलिसांना साक्षीच्या जबाबामध्ये विसंगती आढळून आल्याने पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता आपणंच आपल्या प्रियकराच्या मदतीने हा कट रचला असल्याचे मान्य केले.

24 तासांच्या आत आरोपींना अटक
पोलिसांनी 24 तासांच्या आत साक्षीसह तिच्या 5 साथीदारांना अटक केली आहे. साक्षी शहा,चैतन्य कांबळे, आतिश लंकेश्वर, रामा पवार, बंडू उर्फ आनंद जाधव, मयूर चंदनशिवे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!