Solapur Crime

Solapur Crime : शतपावलीसाठी गेलेल्या API ची निर्घृणपणे हत्या; पोलीस दलात उडाली खळबळ

22892 0

सोलापूर : सोलापुरमध्ये (Solapur Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे सोलापूर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये सोलापुरातील (Solapur Crime) सांगोला तालुक्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. सूरज चंदनशिवे असं या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचं नाव आहे. जेवण झाल्यावर काल रात्री बाराच्या सुमारास शेताबाहेर रस्त्यावर शतपावलीसाठी गेले असताना अज्ञातांकडून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

काय घडले नेमके?
सूरज चंदनशिवे सध्या गावाकडे शेतात राहायला आला होता. रोज जेवण झाल्यावर रात्री उशिरा त्याला शतपावली करायची सवय होती. त्याचपद्धतीने काल रात्री तो जेवण झाल्यावर वासूद केदारवाडी रोडवर शतपावली करत होता. मात्र त्याच वेळी दबा धरुन बसलेल्या मारेकऱ्यांनी त्याची निर्घृणपणे हत्या केली. रात्री तो परत घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोध सुरु केला असता पहाटे फिरायला आलेल्या काही जणांना सूरज चंदनशिवे यांचा मृतदेह शेतात दिसला. यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. याची माहिती मिळताच सांगोला पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि सूरज चंदनशिवे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

दोन महिन्यांपूर्वी पोलीस दलातून बडतर्फ
सूरज विष्णू चंदनशिवे हा सहाय्यक पोलीस निरीक्षक होता. 2018 साली झालेल्या वारणानगर इथल्या नऊ कोटी रुपये चोरी प्रकरणातील संशयित आरोपी सूरज चंदनशिवेवर गुन्हा दाखल होऊन त्याचे पोलीस दलातून निलंबन करण्यात आले होते. वर्षभरापूर्वी निलंबन मागे घेऊन सध्या सांगली पोलीस मुख्यालयात कंट्रोल विभागात कार्यरत होता. मात्र दोन महिन्यांपूर्वी सूरज चंदनशिवेला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलं होतं. एका पोलीस अधिकाऱ्याची अशा रितीने झालेल्या निर्घृण हत्येमुळे सांगोला परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!