Solapur Crime

सोलापूर हादरलं ! कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या; अन् पतीचीही आत्महत्या

904 0

सोलापूर : सोलापूरमध्ये पती- पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आधी पतीने पत्नीची गळा कापून हत्या केली अन् त्यानंतर स्वतः आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर हादरलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंद्रूप या ठिकाणी ही घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

काय घडले नेमके?
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप गावामध्ये ही घटना घडली आहे. यामध्ये आरोपी पतीने पत्नीचा सत्तुरने गळा कापून खून केला आहे. यानंतर आरोपी पतीने घराशेजारी असणाऱ्या झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लाडलेसब हुसेनी नदाफ (वय वर्षे 65) (Ladlesub Hussaini Nadaf) असे आरोपी पतीचे नाव आहे तर नगुमा लाडलेसब नदाफ (वय वर्षे 63) (Naguma Ladlesb Nadaf) असे मृत पत्नीचे नाव आहे.

या घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. मंद्रूप पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!