Solapur Crime

Solapur Crime : खळबळजनक ! चुलत्याचा खून केल्यानंतर आरोपी मुंडकं हातात घेऊन बाईकवरून संपूर्ण गावभर फिरला

956 0

सोलापूर : सोलापुर (Solapur Crime) जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये माढा जिल्ह्यात जमिनीच्या वादातून पुतण्याने चुलत्याची निर्घृणपणे हत्या केली आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने चुलत्याची हत्या केल्यानंतर त्याचं मुंडकं कापलं. इतकंच नाही तर हे मुंडकं घेऊन तो बाईकवरुन गावभर फिरत होता. यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
शिवाजी जाधव असं या आरोपीचं नाव आहे. त्याने जमिनीच्या एका तुकड्यासाठी कुऱ्हाडीने वार करून आपल्या चुलत्याची हत्या केली आहे. शंकर जाधव असे खून करण्यात आलेल्या चुलत्याचे नाव आहे. हत्या केल्यानंतर त्याने चुलत्याचं मुंडकं कापलं आणि ते बाईकवर घेऊन संपूर्ण गावभर फिरला. जवळपास दीड तास तो रस्त्यावर मुंडकं घेऊन फिरत होता.

यानंतर गावातील नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर 10 ते 15 पथकं त्याच्या मागावर पाठवण्यात आली होती. पोलीस पाठलाग करत आहेत हे समजल्यानंतर आरोपीने माळीनगर येथे मुंडकं आणि दुचाकी फेकून दिली. यानंतर त्याने थेट माळीनगर येथे पोलिसांकडे स्वतःला स्वाधीन केले. यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Lok Sabha : पुणे लोकसभा पोटनिवडणुक घ्या, मुंबई हायकोर्टाचा निवडणूक आयोगाला आदेश

Aadhar Card : आधार कार्डबाबत मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Kurla Fire : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) स्थानकात बुकिंग आणि वेटींग हॉलला भीषण आग

Pune News : पुण्यात रात्री उशीरापर्यंत धांगडधिंगा घालणाऱ्या ‘या’ 10 नामांकित हॉटेल्सवर कारवाईचा बडगा

Supriya Sule : खा. सुळे दुसऱ्यांदा ठरल्या विशेष संसद महारत्न

Ravindra Berde : अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे भाऊ रवींद्र बेर्डे यांचे निधन

Mahadev Book App : महादेव अ‍ॅपच्या सहसंस्थापकाला UAE मधून अटक

Pune News : नसते धाडस आले अंगलट ! कुंडात उतरलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Santosh Bhaichand Chordia : एकपात्री हास्य कलाकार युवा साथी संतोष भाईचंद चोरडीया यांचे निधन

Pune Crime : एकाला सोडलं; दुसऱ्याला पकडलं अन् तिथेच सगळं संपलं; तब्बल 10 वर्षांनी प्रियकराने तोंड उघडलं

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!