Radhika

Akola Crime : आई-वडिलांसोबत लग्नाला गेली आणि बेपत्ता झाली; अन् दुसऱ्या दिवशी…

24871 0

अकोला : अकोला (Akola) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये 12 मे रोजी लग्नसोहळ्यासाठी कुटुंबियांसोबत गेलेली सहा वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली. हि घटना तपोवन देवी परिसरात घडली होती. यानंतर या चिमुकलीच्या कुटुंबियांनी मुलगी हरवल्याची तक्रार अंढेरा पोलिसात दिली होती. यानंतर तिचा तपास केला असताना आज या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
मृत मुलीचे नाव राधिका विलास इंगळे (Radhika Vilas Ingle) आहे. घटनेच्या दिवशी ती कुटुंबियांसोबत लग्नासोहळ्यात आली होती. या ठिकणाहून अचानक ती बेपत्ता झाली. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिला सगळीकडे शोधले मात्र तिचा कुठेच पत्ता लागला नाही. यानंतर अखेर कुटुंबीयांनी राधिका बेपत्ता झाल्याची पोलिसांत तक्रार दाखल केली. तसेच सोशल मीडियावर राधिकाचा फोटोही शेअर करण्यात आला होता. यानंतर आज तिचा मृतदेह आढळून आल्याने तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे .

अंढेरा पोलिस ठाणेदार गणेश हिवरकर (Andhera Police Thanedar Ganesh Hivarkar) यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी राधिकाचा शोध घेतला. तसेच राधिकाचा फोटोही सोशल मीडियावरून शेअर करण्यात आला होता. यानंतर तपोवन देवीच्या मंदिराच्या मागे डोंगराळ भागात राधिकाचा मृतदेह आढळून आला. राधिकाचा चेहरा दगडाने ठेचण्यात आला आहे. तर अंगावरचे सर्व कपडे व्यवस्थित असल्याचेदेखील पोलिसांनी सांगितले आहे. या चिमुकलीची हत्या (Murder) नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली याचा तपास पोलीस करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!