हडपसरमधील कालव्यात तीन मृतदेह सापडल्याची घटना उघडकीस आली.
कालव्यात सापडलेल्या मृतांची रात्री उशीरापर्यंत ओळख पटू शकली नाही.
हडपसरमधील शिंदे वस्ती परिसरात कालव्यात एक मृतदेह तसेच वैदुवाडी परिसरात दोन मृतदेह वाहून आल्याची माहिती रहिवाशांनी पोलीस तसेच अग्निशमन दलाला दिली.