Sana Khan

Sana Khan Murder Case : सना खान यांच्या फोनमधील ‘त्या’ व्हिडिओंमुळे झाला वाद; आरोपीने केला धक्कादायक खुलासा

1166 0

नागपूर : भाजपच्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकारी सना ऊर्फ हिना खान (वय 34 ,रा.अवस्थीनगर) (Sana Khan Murder Case) यांच्या हत्येप्रकरणी तिचा पती अमित उर्फ पप्पू शाहू याला अटक (Sana Khan Murder Case) करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याने सना खान हिच्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओ पाहिले. त्यामुळे तो संतापला. त्याने सना यांना जाब विचारला. मात्र, सना यांनी त्या व्हिडिओ बाबत बोलणे टाळले. त्यानंतरच त्याचे सना यांच्यासोबत खटके उडायला लागले, अशी धक्कादायक माहिती आरोपीच्या चौकशीतून समोर आली आहे.

काय घडले नेमके?
दोन महिन्यांपूर्वी सना या पप्पूला भेटायला जबलपूरला गेल्या. यावेळी सना कामानिमित्त बाहेर गेल्या. त्या मोबाइल पप्पूच्या घरीच विसरल्या. पप्पूने सना यांच्या मोबाइल बघितला असता त्याला अनेक व्हिडिओ दिसले. सुमारे अर्ध्या तासानंतर त्या घरी परतल्या. पप्पूने चित्रफितीबाबत विचारणा केली. सना यांनी मौन बाळगले. त्याच दिवशी सना नागपुरात परतल्या. त्यानंतर पप्पूने सना यांना खर्चासाठी पैसे देणे बंद करीत बोलणेही कमी केले. 1 ऑगस्टला सकाळी वाद झाल्यानंतर सना तडकाफडकी जबलपूरला गेल्या. 2 ऑगस्टला सकाळी 7 वाजताच्या सुमारास त्या पप्पूच्या घरी गेल्या. पप्पूला आवाज दिला. त्याने दार उघडले नाही. सना खिडकीतून जोरजोराने पप्पूशी वाद घालायला लागल्या.

या भांडणाने शेजारी बाहेर येतील, या भीतीने पप्पूने दार उघडले. घरात जाताच सना यांनी त्याच्याशी पुन्हा वाद घातला.यादरम्यान पप्पू व सनामध्ये झटापट झाली. संतप्त पप्पूने काठीने सना यांच्या डोक्यावर वार केले. यात सना यांचा मृत्यू झाला. यानंतर आरोपीने 7.30 वाजताच्या सुमारास सना यांचा मृतदेह चादरमध्ये गुंडाळून गाडीच्या डिक्कीत ठेवून त्याने मित्र राजेशच्या मदतीने नदीत फेकून दिला.

Share This News
error: Content is protected !!