Sharad Mohol Murder

Sharad Mohol Murder : शरद मोहोळच्या हत्या प्रकरणी विठ्ठल शेलारला अटक ! हा विठ्ठल शेलार नेमका आहे तरी कोण?

1022 0

पुणे : काही दिवसांपूर्वी कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याची (Sharad Mohol Murder) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकारात आणखी आकरा जणांना अटक केली आहे. यामध्ये पुण्यातून पाच जण तर पनवेलमधून सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये विठ्ठल शेलार याचा देखील समावेश आहे. आता तुम्ही म्हणाल हा विठ्ठल शेलार कोण? त्याचे शरद मोहोळच्या हत्येत काय कनेक्शन आहे? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.

कोण आहे विठ्ठल शेलार?
विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यातील बोतरवाडी येथील आहे. यापूर्वी तो पुणे शहरातील गणेश मारणे टोळीसाठी वसुली करत होता. मुळशी येथे दोघांचा जाळून खून केल्यानंतर विठ्ठल शेलारच्या दहशतीचा नवीन अध्याय सुरु झाला होता. पिंटू मारणे याचा खून केल्यानंतर त्याने स्वतःचे नेटवर्क तयार केले. त्याच्यावर नऊ गंभीर गुन्हे दाखल असून, 2014 मध्ये त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

6 महिन्यांपूर्वी मोहोळ टोळीच्या हल्ल्यातून बचावला
सहा महिन्यांपूर्वी राधा चौकात या दोन्ही टोळ्या एकमेकांसमोर आल्या होत्या तेव्हा मोहोळ टोळीने केलेल्या हल्यावेळी विठ्ठल शेलार पळाल्याने वाचला होता. यातूनचा मोहोळ याचा खून केल्याचे समोर आले आहे.

काय घडले होते नेमके?
कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol) याची 5 जानेवारी रोजी पुण्यात भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शरद मोहोळ याच्या लग्नाच्या वाढदिवशी घराजवळ कोथरुडच्या सुतारदरा भागात त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर मोहोळला लगेचच जवळच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या ठिकाणी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Munnawar Rana : लोकप्रिय शायर मुन्नावर राणा यांचं निधन

Uddhav Thackeray : ‘उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर मोठं कांड होणार आहे’; अज्ञात व्यक्तीने केला नियंत्रण कक्षाला फोन

Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट ! आणखी 11 जणांना घेतलं ताब्यात

Rohit Sharma : रोहित शर्मा मैदानात उतरताच करणार ‘हा’ मोठा विश्वविक्रम

Milind Deora : मिलिंद देवरांसोबत ‘या’ पदाधिकाऱ्यांनी केला शिवसेनेत प्रवेश

Viral Video : धावत्या दुचाकीवर एकमेकांना मिठी मारत अन् अंगावर ब्लँकेट घेत जोडप्याने केले नको ते चाळे

Pune News : खुशखबर ! अष्टविनायक दर्शनासाठी आता एसटीची विशेष सेवा

Milind Deora : ‘देवरा यांच्या राजीनाम्याची वेळ PM मोदींनी ठरवली’; ‘या’ काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

Sharad Mohol : मोहोळचा गेम झालाय, मास्टरमाईंडला सांगा; हत्येनंतर आरोपींनी ‘या’ सरकारी कर्मचाऱ्याला केला कॉल

Gold Rate Today : सोनं-चांदी महागली!

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!