Sharad Mohol

Sharad Mohol Murder : शरद मोहोळची ‘ती’ इच्छा राहिली अपूर्ण

646 0

पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol Murder) याची 5 जानेवारी रोजी पुण्यात भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शरद मोहोळ याच्या लग्नाच्या वाढदिवशी घराजवळ कोथरुडच्या सुतारदरा भागात त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर मोहोळला लगेचच जवळच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या ठिकाणी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शरद मोहोळच्या मृत्यूला राजकीय महत्त्वाकांक्षा कारणीभूत?
कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. ऑक्टोबर 2021 मध्ये चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपचा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमाला गुंडांच्या बायकांनी हजेरी लावली होती. गुंडांच्या सौभाग्यवतींनी चंद्रकांत पाटलांचा सत्कारही केला होता. यात स्वाती मोहोळ यांचा देखील सहभाग होता. पुण्यात या प्रसंगावरुन मोठा गदारोळ झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी सारवासारव केली होती. हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला होता. पासेस वगैरे नव्हते, असं म्हणत त्यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला होता.

कोण आहेत स्वाती मोहोळ?
स्वाती मोहोळ या कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नी आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केल्यानंतर त्यांना महिला आघाडीचे पदही देण्यात आले होते. शरद मोहोळने हिंदूरक्षक, गोरक्षक म्हणूनही स्वत:ची प्रतिमा उंचावली होती. त्यातूनच त्याची राजकारणातील महत्त्वाकांक्षा वाढल्याचे दिसून येत होते.

‘ती’ इच्छा राहिली अपूर्ण
आगामी महापालिका निवडणुकीत पत्नीला नगरसेवक करायचे, अशी इच्छाही मोहोळने प्रगट केली होती. त्याची वाढती महत्त्वाकांक्षा काहींसाठी अडचणीची ठरली असती. त्यातून कोणी पाऊल उचलले आहे का, याचीही चौकशी करण्यात येत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nashik Accident News: स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे बसचा भीषण अपघात; नाशिकमधील घटना

Sharad Mohol Murder : शरद मोहळ हत्याकांडात मोठा खुलासा ! ‘या’ दिवशी आरोपी एकत्र आले अन् त्यानंतर…;

MIT : एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे 13 वी ‘भारतीय छात्र संसद’ चे माजी उपराष्ट्रपती वैकय्या नायडू यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Latur News : भरधाव कारच्या धडकेत ‘या’ माजी नगराध्यक्षाचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Sharad Mohol Murder : गुन्हेगारी जगतात नव्या बकासुराची एन्ट्री? दोस्तीत कुस्ती करणारे मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे नेमके आहेत तरी कोण?

Gautami Patil : डान्सर गौतमी पाटीलच्या ड्युप्लिकेटची मार्केटमध्ये हवा; नेमकी ‘ती’ लावण्यती आहे तरी कोण?

Sharad Mohol Murder : शरद मोहोळचा खून झाल्यानंतर पहिल्या दीड तासात काय घडलं? समोर आली ‘ही’ महत्वाची माहिती

Ravindra Waikar : ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ आमदाराच्या घरी ईडीचा छापा

Swati Mohol : माझा नवरा वाघ होता, मी वाघीण आहे, स्वाती मोहोळ यांनी घेतली आक्रमक भूमिका

Beed Crime : पतंग काढण्याच्या नादात 9 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Shahajibapu Patil : शेकापकडून शहाजी बापूंचा होमग्राउंडवरच करेक्ट कार्यक्रम! ‘त्या’ निवडणुकीत पत्कारावी लागली हार

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!