Selfie

Selfie : सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतला; 4 तरुणांचा दुर्दैवी अंत

759 0

चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आठ पर्यटक तरुणांना सेल्फी (Selfie) काढण्याचा मोह जीवावर बेतला आहे. यादरम्यान सेल्फी (Selfie) काढताना एक तरुण तलावात पडला.यानंतर लागोपाठ तीन तरुणही तलावात पडले. बाकीच्या 4 जणांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अपयश आले. मनीष श्रीरामे ( वय 26 वर्षे), धीरज झाडे ( वय 27 वर्षे), संकेत मोडक ( वय 25 वर्षे), चेतन मांदाडे (वय 17 वर्षे) अशी मृत तरुणाची नावे आहेत. या घटनेने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

Buldhana News : मित्राची बाईक पळवली अन् घात झाला; तरुणाचा जागीच मृत्यू

काय घडले नेमके?
जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात प्रसिद्ध घोडाझरी तलाव आहे. दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असतात. आज वरोरा तालुक्यातील आठ युवक चारचाकी वाहनाने तलावाकडे आले होते. यातील काहीजण युवक घोडाझरी तलावात मौज मस्ती करताना कॅनल परिसरात गेले. त्या ठिकाणी त्यांना सेल्फी काढण्याचा मोह अनावर झाला.

Satara News : एकीव धबधब्यात पडून साताऱ्यातील 2 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

यादरम्यान सेल्फी (Selfie) घेत असतांना एक तरुण घसरून पडला. त्याच्यानंतर तीन युवक लागोपाठ घसरून पडले. यानंतर बाकी 4 जणांनी त्यांना वाचवण्याच्या प्रयत्न केला. पण त्यात त्यांना अपयश आले. मृतात मनीष श्रीरामे, धीरज झाडे, संकेत मोडक, चेतन मांदाडे या चौघांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर आप्पती व्यवस्थापन विभागाची टीम घटनास्थळी रवाना झाली.

Share This News
error: Content is protected !!