Pune Crime News

घरात झोपलेल्या मुलीला पाहून नराधम बापाची नियत फिरली; पोलिसांनी आरोपी पित्याला ठोकल्या बेड्या

360 0

जन्मदात्या पित्याने बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारं कृत्य केलं आहे, ज्यामुळे संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. स्वतःच्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधम पित्याने मुलीवर अत्याचार केल्याची घटना 15 ऑक्टोबर रोजी हिंगोली जिल्ह्यात घडली.

या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम बापाला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही आठवीच्या वर्गात शिकते. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी कुटुंबातील आई, भाऊ, आणि आजी- आजोबा कामासाठी घराबाहेर गेले होते. मात्र डोकं दुखत असल्यामुळे पीडित मुलगी ही शाळेत न जाता घरीच आराम करण्यासाठी थांबली. दरम्यान, दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास या नराधम बापाने मुलगी घरात एकटीच झोपलेली पाहिली. तिला पाहून त्याने घराचे दोन्ही दरवाजे बंद करून घेतले व तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलीने ‘पप्पा मला सोडा, बाहेर जाऊ द्या’, अशी विनवणी केली. परंतु नराधम बापाला लेकीची जराही दया आली नाही व त्याने तिच्यावर अत्याचार केले.

दरम्यान, पीडितेचा भाऊ शेतातील काम आटपून घरी आला असता त्याने दरवाजा उघडल्यावर हा धक्कादायक प्रकार बघितला. त्यावेळी त्याने वडिलांना जाब विचारला असता हा नराधम मागच्या दाराने पळून गेला. दरम्यान या प्रकरणी, पीडित मुलीने गोरेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून नराधम बापाला अटक करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!