सध्याची नवी पिढी ही मोबाईल आणि टीव्हीच्या आहारी गेली असून इलेक्ट्रॉनिक गॅझेटस् न मिळाल्यास ही मुलं अनेकदा आक्रमक होताना दिसून येतात. याच आक्रमकपणात आपल्याच आईवर एका 14 वर्षाच्या मुलाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना पुण्यात घडली आहे.
या 14 वर्षीय मुलाच्या आईने पोलिसांकडे सहकार नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हे कुटुंब धनकवडी परिसरात वास्तव्यास आहे. कुटुंबात आई-वडील, मोठी बहीण आणि हा मुलगा आहे. या मुलाला मोबाईलचं व्यसन लागलं आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून तो आक्रमक झाला आहे. पण एकदा तो घरातील इतरांना मारहाण करतो. मोबाईल मागतो, पैसे मागतो. आणि न दिल्यास कुटुंबातील सदस्यांना मारहाण करतो. तसेच घरातील वस्तूंची तोडफोडही करतो. अनेकदा समजावून सांगूनही हा मुलगा आई-वडिलांचे ऐकत नसल्याचं या फिर्यादीत म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं ?
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 14 ऑक्टोबर रोजी घडली. फिर्यादी महिला आणि त्यांचा मुलगा मोबाईलवर मालिका पाहत होत्या. मालिका संपल्यानंतर त्यांनी मोबाईल बंद करून ठेवून दिला. याचाच राग त्यांच्या मुलाला आला. त्याने रागाच्या भरात घरातील लाकडी फोटो फ्रेम फिर्यादी महिलेच्या म्हणजेच आपल्या आईच्या डोक्यात घातली. त्यांच्या डोक्यात मारून त्यानेही प्रेम फोडली. त्यानंतर हातात कात्री घेऊन आईच्या अंगावर मारण्यासाठी तो धावून गेला. त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच या मुलाने आपल्याच आईला लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. याच राहतात त्यांनी घराच्या खिडक्या फोडल्या. वस्तूंची तोडफोड केली. यामध्ये ही महिला जखमी झाली आहे. आणि अखेर आपला मुलगा वारंवार अशाच प्रकारे शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्यामुळे त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंद केली. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलाचं समुपदेशन करण्यात येणार आहे. मात्र या घटनेने पालकांच्या चिंतेत भर घातली आहे.