Maratha Reservation

Maratha Reservation : धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी दिवसभरातील दुसरी आत्महत्या; छत्रपती संभाजीनगरच्या तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

787 0

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुसाईड नोट लिहून हिंगोलीत तरुणाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आता छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणीदेखील मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे. गणेश काकासाहेब कुबेर असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरच्या आपतगाव येथे एका मराठा तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. गणेश काकासाहेब कुबेर असे या मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या युवकाच नाव आहे. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत माझ्यावरती अंत्यसंस्कार करू नका असे एका शाळेतील पाटीवर लिहून या तरुणाने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!