योगेश टिळेकर (yogesh tilekar) यांचे मामा सतीश वाघ (SATISH WAGH) यांची हत्या झाली. ही हत्या आर्थिक किंवा राजकीय वादातून झाली असल्याची पोलिसांना आणि कुटुंबीयांनाही शक्यता वाटत होती. त्याच अँगलने पोलीस तपासही करत होते. मात्र हे प्रकरण जसं दिसतंय तसं नसेल, हे सुरुवातीपासूनच पोलिसांना वाटत होतं. त्यामुळे हळूहळू पोलिसांनी तपासाचे अँगल बदलले आणि समोर आलं धक्कादायक सत्य…. सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ निघाली हत्येची मुख्य सूत्रधार…
नेमकं प्रकरण काय ?
सतीश वाघ हे 9 डिसेंबरला सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकवा गेले. त्यावेळी त्यांच्यावर नजर ठेवून असलेल्या चार ते पाच जणांनी त्यांना जबरदस्तीने कार मध्ये बसवलं. त्यांचं अपहरण केलं आणि ही कार सोलापूर रस्त्याच्या दिशेने निघाली. सतीश वाघ हे भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा होते. त्यामुळे या केसला मोठं महत्त्व प्राप्त झालं. पुणे पोलिसांची तपास पथकं रवाना झाली. मात्र केवळ बारा तासाच्या आत शिंदवणे घाटात त्यांचा मृतदेह आढळून आला आणि पोलीसही चक्रावले.
सतीश वाघ हे व्यावसायिक होते. त्यांचे काही हॉटेल, रिसॉर्ट आणि शेत जमीनही होती. त्याबरोबरच त्यांनी एका व्यक्तीला 35 लाख रुपये दिले होते. जे ती व्यक्ती त्यांना परत करत नव्हती. त्यामुळे वाघ हे त्यांना सतत फोन करत होते. अशी माहिती त्यांच्या मुलाने दिली होती. त्यामुळे आर्थिक वादातूनच ही हत्या झाली असल्याचं प्रथमदर्शी वाटत होतं. अपहरण झाल्यानंतर च्या बारा तासात पोलिसांना कोणताही क्लू मिळाला नव्हता, त्यातच आरोपींचा तपासही लागत नव्हता त्यामुळे पुणे पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत होती. त्यामुळे तब्बल 16 पथकांकडून पोलिसांनी तपास सुरू केला.
बीडचे किस्से, कारनामे… मिर्जापूरही पडेल मागे!
https://www.topnewsmarathi.com/crime/tales-and-exploits-of-beed-mirzapur-will-also-fall-behind/
पत्नीच निघाली मास्टरमाईंड
आमदाराच्या मामाचा 12 तासात खून होतो. आणि आरोपी अजूनही मोकाट असतात, त्यामुळेच पोलिसांची 16 पथक कामाला लागली. तपासून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. सतीश वाघ यांची अपहरणानंतर काही वेळातच हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात टाकून देण्यात आला. या प्रकरणांमध्ये पोलिसांना एक एक क्लू मिळत गेला आणि हत्येमध्ये सहभाग असलेल्या पवन श्यामसुंदर शर्मा आणि नवनाथ अर्जुन गुरसाळे या आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर ही हत्या पाच लाखांची सुपारी देऊन केल्याचं समोर आलं. त्यातच पूर्वीचा भाडेकरू असलेल्या तरुणाचा या प्रकरणात सहभाग आढळला. अक्षय ऊर्फ सोन्या हरीश जवळकर असं या भाडेकरूचं नाव असून त्यानेच ही सुपारी घेतल्याचं स्पष्ट झालं. पुढे या प्रकरणात विकास शिंदे आणि अतिशय जाधव या दोघांनाही अटक झाली. पाच आरोपी कोठडीत असूनही हत्येचा मुख्य कारण आणि सूत्रधार अजूनही समोर आला नव्हता. मात्र त्याच वेळी तपासात ट्विस्ट आला तो लव्ह अँगल… सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिचे पूर्वीचा भाडेकरू आणि सुपारी घेणारा मुख्य आरोपी अक्षय जवळकर याच्याशी अनैतिक संबंध असल्याचं आढळलं. पोलिसांनी तिच्याकडेही कसून चौकशी केली आणि अखेर पत्नीनेच दिली सतीश वाघ यांच्या हत्येची कबुली… पुणे पोलिसांकडे मोहिनी वाघच्या विरोधातील पुरावे आधीच होते. त्यासाठीच त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. अनेक तासांच्या या चौकशीतून अखेर मोहिनी वाघ यांनी सर्व सत्य सांगितलं. प्रेम प्रकरणात अडथळा ठरत असलेल्या पतीची पाच लाखांची सुपारी देऊन प्रियकरा करवे हत्या केल्याप्रकरणी मोहिनी वाघ तिला पोलिसांनी अटक केली आहे.
कारण काय ?
एका व्यावसायिकाची पत्नी असलेली मोहिनी वाघ.. हिचे सुपारी घेणाऱ्या अक्षय जवळकर बरोबर प्रेम संबंध होते. त्यात पती सतीश वाघ अडथळा ठरत होते. दुसरीकडे सतीश वाघ पत्नीला अनेकदा किरकोळ मारहाण करायचे. घरातील आर्थिक व्यवहारां पासून मोहिनीला दूर ठेवलं जात होतं. त्यामुळेच पतीकडून होणारी मारहाण, आर्थिक व्यवहार आपल्या हातात यावेत आणि प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा कायमचा काटा काढण्यासाठी मोहिमेने आपल्याच प्रियकराला सुपारी देऊन पतीची हत्या केली.
वाल्मिक कराडसह धनंजय मुंडेंचे नाव घेऊन संभाजीराजेंची पोस्ट