Satara Crime

Satara Crime : साताऱ्यातील बहुचर्चित ‘त्या’ खून प्रकरणाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश; 4 जणांना अटक

664 0

सातारा : साताऱ्यामध्ये (Satara Crime) काही महिन्यापूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती. जमीन खरेदी विक्री करणाऱ्या एका एजंटचा खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची समोर आली होती. याप्रकरणी बुधवारी रात्री उशीरापर्यंत पोलिसांनी काहींना ताब्यात घेतले आहे. तसंच ताब्यात घेतलेल्या विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात चाैघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक देवाण-घेवाणीतून हा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

काय घडले होते नेमके?
संशयित शिवाजी शिंदे याचे संदीप संकपाळ यांच्याबरोबर जमीन विक्री कमीशनवरुन वाद झाला होता. यातून चिडून संदीप संकपाळ यांना 21 ऑगस्ट 2023 रोजी साताऱ्यातील पोवई नाक्यावरु बोलावुन संशयितांनी अज्ञात स्थळी नेलं होतं. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी दोनच्या सुमारास संकपाळ यांचा गळा आवळून खून करण्यात आला.

यानंतर आरोपींनी संशय येऊ नये म्हणून खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी संदीप संकपाळ यांचा मृतदेह पाडेगाव, ता. खंडाळा गावच्या हद्दीतील ओढाजवळ पुरून ठेवण्यात आला होता. याबाबत सातारा शहर पोलिस ठाण्यात चाैघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली असून पोलिस पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!