Satara News

Satara News : साताऱ्यात फटाक्याने अचानक पेट घेतल्याने घराला भीषण आग

557 0

सातारा : राज्यात दिवाळीला सुरुवात झाली आहे. सगळीकडे हा सण धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. यादरम्यान साताऱ्यात (Satara News) एक मोठी दुर्घटना घडली आहे. साताऱ्यातील मध्यभागी असणाऱ्या प्रतापगंज पेठेतील एसबीआय बँकेसमोरील घरात ठेवलेल्या फटाक्यांमुळे घराला आग लागली आहे. या आगीमुळे परिसरात सातारा शहरातील नागरिकांनी प्रतापगंज पेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली.

काय घडले नेमके?
दिवाळी सणाची सर्वत्र धांदल उडाली असून अनेकांनी फटाके खरेदी केले आहेत. प्रतापगंज पेठेतील एका घरात दिवाळीसाठी आणलेले फटाके पेटल्याने घराला आग लागली. गुरूवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. या आगीमुळे आणि फटाक्याच्या आवाजामुळे परिसरातील लोकांनी आग लागलेल्या घराकडे धाव घेतली. तातडीने काहींनी वीजपुरवठा खंडीत केला. अचानक लागलेल्या आगीमुळे घरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

या आगीची माहिती मिळताच सातारा पालिकेच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थाळी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी घरातील साहित्य, फटाके आणि गॅस वेळीच घराबाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News
error: Content is protected !!