Satara Accident

Satara Accident : महाबळेश्वरला फिरायला गेले असताना दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

12049 0

सातारा : साताऱ्यामध्ये (Satara Accident) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये साताऱ्यातील खंडाळा तालुक्यातील पंढरपूर फाटा-फलटण रस्त्यावर लोणी येथील एका वळणावर दुचाकी आणि टेम्पोच्या भीषण अपघात (Satara Accident) झाला. या भीषण अपघातात दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. मनोज परमार (वय 21), अजय जाधव (वय 21) अशी या अपघातात मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत.

हीच वाढदिवसाची अनमोल भेट ठरेल…; सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना केलं ‘हे’ आवाहन

काय घडले नेमके?
सुरवडी येथील तीन युवक गुरुवारी पाचगणी, महाबळेश्वरला फिरण्यासाठी गेले होते. या ठिकाणाहून परतत असताना पंढरपूर फाट्यावर आले असताना पोलीस वाहनांची तपासणी करत होते. यावेळी दुचाकीवर ट्रिपल सीट असणाऱ्या तिघांपैकी एकजण गाडीवरून खाली उतरला. नंतर उर्वरित दोघेजण पंढरपूर फाट्यावरून सुरवडीकडे जात असताना फलटणकडून येणाऱ्या लोणी येथील एका वळणावर टेम्पोला दुचाकीची जोराची धडक बसली आणि हा भीषण अपघात झाला. या अपघातात (Satara Accident) बाइकवरील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच शिरवळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्यानी घटनेचा तपास करून पंचनामा केला. त्यानंतर शिरवळ ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून या दोन तरुणांचे मृतदेह शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तरुणांच्या आकस्मिक मृत्यूने सुरवडी गावावर शोककळा पसरली आहे. शिरवळ पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!