Satara Crime News

Satara Crime News : साताऱ्यात भर चौकात महिलेला बेदम मारहाण

973 0

सातारा : साताऱ्यामध्ये (Satara News) एक संतापजनक घटना समोर आली आहे. यामध्ये (Satara Crime News) भररस्त्यात एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे. माण तालुक्यातील पानवण या ठिकाणी हा संतापजनक प्रकार घडला आहे.

काय घडले नेमके?
माण तालुक्यातील पानवण येथे गुरांना चारा घेण्यासाठी दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून 4 जणांनी भर चौकात एका महिलेला उसाने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मारहाण करणाऱ्यांनी महिलेवर धारदार शस्त्राने वार देखील केले आहेत.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत 2 जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी शिवीगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी देवदास नरळे, पिंटू नरळे या दोघांना अटक केली आहे. तर अन्य आरोपी संतोष नरळे, जनाप्पा शिंदे हे दोघे पळून गेले आहेत. या हल्ल्यात पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिला म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. या प्रकरणी देवदास महादेव तुपे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

Share This News
error: Content is protected !!