Satara Crime

Satara Crime : सातारा हादरलं ! फलटणमध्ये 35 वर्षीय व्यक्तीची अज्ञाताकडून निर्घृणपणे हत्या

2145 0

सातारा : सातारा जिल्ह्यातील (Satara Crime) मलवडी ता. फलटण गावाच्या हद्दीमध्ये आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला.

काय घडले नेमके?
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मलवडी गावातील अनिल महादेव चव्हाण (वय 35) या व्यक्तीची आज सकाळी 6 वाजण्याच्यापूर्वी मलवडी गावाच्या हद्दीत अज्ञाताकडून धारदार शस्त्राने डोक्यात वार करून हत्या करण्यात आली. ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी फलटण ग्रामीण विभागाचे पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

Share This News
error: Content is protected !!