Satara Accident News

Satara Accident News : देवदर्शनासाठी निघालेल्या चौघांचा दुर्दैवी मृत्यू; साताऱ्यामधील घटना

761 0

सातारा : साताऱ्यामध्ये (Satara Accident News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये देवदर्शनासाठी निघालेल्या 4 भाविकांवर काळाने घातला आहे तर 4 गंभीर जखमी आहेत. या अपघाताची (Satara Accident News) माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्याला सुरुवात केली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तसेच बाकी जखमींना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काय घडले नेमके?
सातारा जिल्ह्यातील सूर्याचीवाडी गावाजवळ ही धक्कादायक घटना घडली आहे. मायणी-दहिवडी मार्गावरील धोंडेवाडी ते सूर्याचीवाडी दरम्यान मारुती ओमनी गाडीचा अपघात होऊन तीन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला आहे. ओमनी गाडी झाडावर आदळल्याने हा अपघात झाला आहे. यामध्ये 3 जण जागीच ठार झाले. तर अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले होते. जखमींमधील एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातग्रस्त सगळे प्रवासी हे कुरोली व बनपुरी येथील रहिवासी होते. बाळू मामाच्या मेंढराचे देवस्थान असलेल्या लाकरेवाडी या ठिकाणी देवदर्शनासाठी जात असताना हा भीषण अपघात झाला.

साताऱ्यातील (Satara Accident News) खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील पांडूरंग देशमुख यांच्या मारुती ओमनी गाडीतून कुरोली व बनपुरी येथील प्रवासी सांगली जिल्ह्यातील लोकरेवाडी येथे देवदर्शनासाठी निघाले होते. कातरखटाव ते मायणी दरम्यान असलेल्या सूर्याचीवाडी गावाच्या हद्दीत चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी झाडावर जाऊन आदळली. या अपघातात चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत. पोलीस उपअधीक्षक अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!