Santacruz Hotel Fire

Santacruz Hotel Fire : सांताक्रूझमधील गॅलेक्सी हॉटेलला भीषण आग, 3 जणांचा मृत्यू

601 0

मुंबई : मुंबईतील सांताक्रूझ (Santacruz Hotel Fire) येथील गॅलेक्सी हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमध्ये (Santacruz Hotel Fire) 3 जणांचा मृत्यू झाला आहे तर 5 जण जखमी झाले आहेत. या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अखेर त्यांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या अपघातातील जखमींना तातडीने व्ही एन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काय घडले नेमके?
गॅलेक्सी बिल्डिंगमधील तिसऱ्या मजल्यावरील गॅलेक्सी हॉटेलमध्ये भीषण आग लागली. ही चार मजली इमारत आहे. या आगीमध्ये रुपल कांजी (वय 25), किशन (वय 28) आणि कांतीलाल गोरधन वारा (वय48) या तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, आग आटोक्यात आल्यानंतर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी पाच जणांची सुटका करून त्यांना उपचारांसाठी व्ही.एन.देसाई रुग्णालयात दाखल केले.

आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येणार
ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले त्यावेळी धूर होता.खिडक्या तोडून लोकांना बाहेर काढण्यात आले. हॉटेलमध्ये अग्निशमाक यंत्रणा होती. पण ती खूप जुनी होती. यात काही निष्काळजीपणा आहे का? याची चौकशी करण्यात येणार आहे.

Share This News
error: Content is protected !!