Sangli News

Sangli News : सांगली हादरलं ! 2 नातवांनी आईसह मिळून केली आजीची हत्या

507 0

सांगली : सांगलीमधून (Sangli News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये खानापूर तालुक्यातील पारे येथे जमिनीच्या वादातून 80 वर्षीय वृद्धेचा नातवानीच टॉवेलने गळा आवळून खून केला. मंगळवारी ही धक्कादायक घटना घडली. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संगीता रामचंद्र साळुंखे यांच्या घरी पारे या ठिकाणी ही घटना घडली. श्रीमती सखुबाई संभाजी निकम (वय 80, रा. चिंचणी मंगरूळ) असे मृत झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. या हत्येप्रकरणी संशयित आरोपी म्हणून अशिष सतिश निकम आणि रेणुका सतिश निकम (दोघेही रा. चिंचणी मंगरुळ ता. खानापूर, जि. सांगली) या दोघांना विटा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
विटा पोलिस ठाण्यात संगीता रामचंद्र साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, फिर्यादी संगीता साळुंखे यांचा भाऊ सतिश संभाजी निकम यांनी त्यांची निम्मी प्रॉपर्टी जावई कुणाल पाटील यांच्या नावावर करण्याचं फिर्यादींनी सतिश निकम यांना सांगितलं. याचा राग मनात धरुन अशिष सतिश निकम आणि रेणुका सतिश निकम यांनी संगनमत करुन दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी फिर्यादी संगिता रामचंद्र साळुंखे यांच्या घरी येऊन तुझ्या भावाला 48 तासाची मुदत देतो, तू भावाला बोलावुन घेऊन सदरची प्रॉपटर्टी फिरवुन दे, नाहीतर तुला आणि म्हतारीला 48 तासानंतर दाखवितो, अशी धमकी दिली होती.

त्यानंतर मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादीची आई सखुबाई संभाजी निकमचा प्रॉपर्टीच्या कारणावरुन चिडून जाऊन टॉवेलने गळा आवळून ठार मारले. पोलिस निरीक्षक शरद मेमाणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Akola News : बहिणीसाठी कायपण ! परीक्षेला कॉपी पुरवण्यासाठी भाऊ बनला तोतया पोलीस; मात्र ‘ती’ चूक पडली महागात

Sharad Pawar : ‘शेवटचा डाव…’ जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याने चर्चेला उधाण

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : अकॅडमीच्या संचालकाने ‘तू काळी आहेस’ म्हणून हिणवल्याने तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

Viral Video : नागपूरमधील माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला; घटना CCTV मध्ये कैद

Resident Doctor : प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून पुन्हा राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!