Sangli Crime

Sangli Crime : धक्कादायक ! शेत जमीन, घर नावावर करत नाही म्हणून मुलाकडून जन्मदात्याची हत्या

1978 0

सांगली : सांगली जिल्ह्यात (Sangli Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कडेगाव तालुक्यातील विहापूरमध्ये शेत जमीन आणि घर नावावर करत नसल्याने मुलानेच जन्मदात्या वडिलांचा खून केला आहे. या प्रकरणी सांगली पोलिसांनी (Sangli Crime) आरोपी मुलाला अटक केली आहे. तानाजी माने असे मृत वडिलांचे नाव आहे. ते विहापूरमध्ये कुटुंबासमवेत राहतात. शेती करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.

काय घडले नेमके?
तानाजी माने यांचा मुलगा प्रदीप याला दारूचे व्यसन होते. गेल्या काही दिवसापासून त्याने वडील तानाजी यांच्याकडे शेत जमीन व घर नावावर करण्यासाठी तगादा लावला होता. परंतु, प्रदीपला दारूचे व्यसन असल्याने तानाजी हे मुलाच्या नावावर घर किंवा शेत जमीन करत नव्हते. यामुळे प्रदीपच्या मनात आपल्या वडिलांविषयी मोठ्या प्रमाणात राग होता.

यानंतर (Sangli Crime) घटनेच्या दिवशी प्रदीप हा शनिवारी दुपारी दारू पिऊन घरी आला. त्यानंतर पुन्हा वडील आणि त्याच्यामध्ये वाद झाला. त्यातून प्रदीपने वडील तानाजी यांना बेदम मारहाण करून त्यांचे डोके फरशीवर आपटून ठेचले.यानंतर गंभीर जखमी झालेल्या तानाजी माने यांना सांगलीमधील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी कडेगाव पोलिसांनी आरोपी प्रदीप मानेला अटक केली आहे.

Share This News
error: Content is protected !!