Sangli Crime News

Sangli Crime News : तुझ्याच आठवणीत जगत राहीन, पण पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही; म्हणत तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

1313 0

सांगली : सांगली (Sangli Crime News) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.यामध्ये सांगली जिल्ह्यातील (Sangli Crime News) शिराळा तालुक्यातील वारणा नदीवरील मांगले आणि सावर्डे बंधाऱ्यावरून एका तरुणाने मोबाईलला स्टेटस ठेवून नदीत उडी मारली आहे. ही घटना शनिवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. तुषार गणपती पांढरबळे (वय 24) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

तुषार हा मूळचा बिळाशीचा आहे. तो मांगलेमध्ये आजोळी आईसह रहात होता. तो मांगलेत खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. वारणा नदीत उडी मारण्यापूर्वी काही तास अगोदर त्याने मोबाईलवर स्टेटस ठेवला होता. यामध्ये त्याने मला शोधण्याचा प्रयत्न करू नको, मी झोकून दिले, कुठेही सापडणार नाही. तुझ्याच आठवणीत जगत राहिन, पण पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही, असा मजकूर ठेवला होता.

घटनेच्या (Sangli Crime News) वेळी तुषार तीनच्या सुमारास मांगले सावर्डे बंधाऱ्याकडे गेला. त्याचे बंधाऱ्यावर बराच वेळ मोबाईलवर कोणाशी तरी बोलणे सुरू होते. त्यानंतर त्याने नदीत उडी मारली. त्याठिकाणी मासेमारी करणाऱ्या लोकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. तुषारने उडी मारल्यानंतर नदीच्या पाण्याच्या प्रवाहात तो दिसेनासा झाला. यानंतर मांगल्याचे पोलीस पाटील संजय कांबळे यांनी घटनेची माहिती शिराळा पोलीस ठाण्यात दिली. यानंतर वारणा नदीत शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले असून त्याचा शोध सुरू आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!