Sangli Crime

Sangli Crime : बायकोच्या ‘त्या’ अफेअरबद्दल समजताच पतीने व्हिडिओ शूट करून उचलले ‘हे’ पाऊल

7460 0

सांगली : सांगलीमध्ये (Sangli Crime) पती आणि पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. यामध्ये पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याने पतीने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. सांगलीतील जत शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे त्याने आत्महत्या करताना मोबाईलवर व्हिडीओ शूटींग केले. या व्हिडीओमध्ये त्याने आत्महत्या करण्याचे कारण सांगितलं आहे.

काय घडले नेमके?
जत शहरातील दत्त कॉलनीतील दत्तात्रय निंगाप्पा कोळी (वय 46) यांनी ही आत्महत्या केली आहे. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत सासू व इतर दोघांच्या विरोधात चिठ्ठी लिहून कोळी यांनी स्वतःच्या मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग करत गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. या घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यामध्ये झाली असून या प्रकरणी मृत कोळी यांच्या पत्नी व सासूसह चौघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नी सुश्मिता, सासू शोभा शिवगोंडा माळी, बाबुराव कागवाडे व सुनील कागवाडे (सर्व रा. जत) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी रुक्मिणी सदाशिव कोळी यांनी फिर्याद दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!