Sangli Crime

Sangli Crime : धक्कादायक ! सर्पदंशाने 15 वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत

1263 0

सांगली : सांगली (Sangli Crime) जिल्ह्यातील जत तालुक्यातील संख गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये 15 वर्षीय विद्यार्थिनीचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. श्रेया श्रीशैल न्हावी (वय 15) असे मृत पावलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे.

काय घडले नेमके?
श्रेया आर. बी. पी. हायस्कूलमध्ये इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होती. नेहमीप्रमाणे श्रेया झोपी गेली. यावेळी गावातील वीज गेली होती. यावेळी आठच्या सुमारास तिला सर्पदंश झाल्यानंतर ती जागी होऊन ओरडू लागली. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला तातडीने खासगी रुग्णालयात नेले. तेथून तिला रात्री दहाच्या सुमारास जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.

तिच्या मृत्यूची बातमी समजताच तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. जत पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!