Sangli Accident

Sangli Accident : धक्कादायक ! दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा भीषण अपघात

551 0

सांगली : सांगलीमधून (Sangli Accident) एक मोठी बातमी समोर आली आहे. देशभरात आज विजयी दशमी दसऱ्याची धामधूम सुरु आहे. मुंबईत दसरा मेळाव्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाचे जोरदार तयारी झाली आहे. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात अर्थात शिवतीर्थवर तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात पार पडणार आहे.

एकीकडे दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना सांगलीमध्ये काही शिवसैनिकांचा अपघात झाला आहे. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू तर तिघे जण जखमी झाले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरढोण गावाजवळ घडली आहे.

एक भरधाव ट्रकने शिवसैनिकांच्या गाडीला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये एकाचा मृत्यू तर तिघे जण जखमी झाले आहेत. हे सगळे शिंदे गटाच्या युवा सेनेचे हे पदाधिकारी आहेत.

Share This News
error: Content is protected !!