Cauhan Death

खळबळजनक ! वाळू माफियांनी पोलिसाला ट्रॅक्टरखाली चिरडलं

593 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटक राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये राज्यातील कलबुर्गी या ठिकाणी गुरूवारी सायंकाळी वाळू माफियांनी एका हेडकॉन्स्टेबलला ट्रॅक्टरखाली चिरडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना जेवरगी तालुक्यातील नारायणपूरजवळील अवैधरित्या वाळू उत्खनन करणार्‍या ट्रॅक्टरला रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या नेलोगी पोलिस स्टेशनमधील पोलिसासोबत घडली आहे.

काय घडले नेमके?
म्हैसूर चौहान (51) असे यामध्ये मृत पावलेल्या पोलिसाचे नाव आहे. म्हैसूर चौहान (Mysore Chauhan) हे घटनेच्या वेळी आपली ड्युटी करत होते. यादरम्यान त्यांना एका ट्रॅक्टरवर संशय आला. यानंतर पोलीस म्हैसूर चौहान यांनी ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र ट्रॅक्टर थांबला नाही. यानंतर आरोपी चालकाने थेट पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. या दुर्घटनेत म्हैसूर चौहान यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ड्रायव्हर सिध्दना याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!