Samruddhi Highway

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालत्या कारमधून प्रवासी बाहेर फेकले गेले

1261 0

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. कारली ते कारंजा दरम्यान नागपूरहून संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या कारचा अपघात झाला आहे. भरधाव कारचा टायर फुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि, यामध्ये दोन जण ठार झाले आहेत, तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.

कसा घडला अपघात?
टायर फुटल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं आणि स्कॉर्पिओ समृद्धी महामार्गाच्या संरक्षक कठड्याला धडकली, ज्यामुळे गाडीतील 5 प्रवासी बाहेर फेकले गेले. बाहेर फेकले गेलेल्या प्रवाशांपैकी दोघांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले, यातल्या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. स्कॉर्पिओमधील सर्व प्रवासी हैद्राबादचे असल्याची माहिती आहे. जखमींना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Share This News
error: Content is protected !!