SANTOSH DESHMUKH: संतोष देशमुख यांना न्याय मिळवुन देण्यासाठी बीडच्या मोर्चात सहभागी होणार; वाल्मिक कराडसह धनंजय मुंडेंचे नाव घेऊन संभाजीराजेंची पोस्ट

SANTOSH DESHMUKH: संतोष देशमुख यांना न्याय मिळवुन देण्यासाठी बीडच्या मोर्चात सहभागी होणार; वाल्मिक कराडसह धनंजय मुंडेंचे नाव घेऊन संभाजीराजेंची पोस्ट

698 0

संतोष देशमुख (Santosh Deshmukh)हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही फरार आहेत. त्यामुळेच या प्रकरणातील मुख्य आरोपींना तातडीने अटक व्हावी व त्यांच्या वर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी आता स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजी राजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) देखील पुढे आले आहेत. संभाजी राजे यांनी यासंदर्भातील एक पोस्ट करत आपली भूमिका मांडली आहे. त्याचबरोबर बीडमध्ये होत असलेल्या मोर्चात सहभागी होणार असल्याचही संभाजी राजे यांनी स्पष्ट केलं आहे. एवढेच नाही तर या पोस्टमध्ये वाल्मिक कराडसह मंत्री धनंजय मुंडे यांचे देखील त्यांनी नाव घेतलं आहे.

संभाजीराजेंची पोस्ट

कै. संतोष देशमुख यांना न्याय मिळवुन देण्याच्या मागणीसाठी बीड मध्ये निघणाऱ्या मोर्चात मी सहभागी होणार आहे, या मोर्चात तुम्ही देखील सहभागी व्हावे. दि. २८ डिसेंबर रोजी बीडमध्ये आयोजित मोर्चामध्ये मी सहभागी होत आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, आरोपी वाल्मिक कराड व इतर दोषींना तात्काळ अटक करावी, ही माझी ठाम मागणी आहे. मी पहिल्याच दिवशी भूमिका घेतली होती की, धनंजय मुंडे यांचे आरोपींशी जवळचे संबंध असल्यामुळे प्रशासनावर दबाव येऊ शकतो. नंतर मुंडे यांनी स्वतःच आरोपी वाल्मिक कराडसोबतचे संबंध मान्य केले आणि त्यांची बाजू उघडपणे घेतल्याने हा दबाव स्पष्ट झाला. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याचे कर्तव्य सरकारचे आहे, परंतु जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय सरकारला जाग येत नाही, हे दुर्दैवी आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी देशमुख कुटुंबीयांसोबत ठामपणे उभा आहे.

बीडचे किस्से, कारनामे… मिर्जापूरही पडेल मागे!

https://www.topnewsmarathi.com/crime/tales-and-exploits-of-beed-mirzapur-will-also-fall-behind/

Share This News
error: Content is protected !!