Nagpur Rape Case

Nagpur Rape Case : धक्कादायक ! भाडेकरू मुलीवर घरमालकाकडून बलात्कार

379 0

नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur Rape Case) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये घरात भाड्याने राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे हा बलात्कार घरमालकानेच केला आहे. नागपुरातील सक्करदरा परिसरात ही घटना घडली आहे. ही घटना समोर येताच नागरिकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. प्रतिक आसोले असं आरोपीचं नाव असून त्याने 14 वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
नागपुरातील सक्करदऱ्यात एक कुटुंब आरोपी प्रतिक आसोलेच्या मालकीच्या घरात भाड्याने राहत होतं. आई-वडील कामानिमित्त घराबाहेर गेले असता आरोपीने संधी साधत मुलीचं तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. याशिवाय या प्रकरणाची माहिती कुणाला दिल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. पीडित मुलीने आई-वडील घरी आल्यानंतर त्यांना घडलेला सारा प्रकार सांगितला.

यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रतिक आसोले याच्यावर गुन्हा दाखल करत त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी प्रतिक आसोले हा अल्पवयीन मुलीवर वाईट नजर ठेवून होता. तिचे आई-वडील बाहेर गेल्याची संधी साधून त्याने हे कृत्य केले असल्याचे तक्रारीमध्ये म्हंटले आहे.

Share This News
error: Content is protected !!