Ayush Prasad Accident

Ayush Prasad Accident : पुणे झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचा भीषण अपघात

613 0

पुणे : राज्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचा भीषण अपघात (Ayush Prasad Accident) झाला आहे. बुधवारी दुपारी पुणे-नाशिक महामार्गावर हा भीषण अपघात (Ayush Prasad Accident) झाला आहे. आंबेगाव तालुक्यातील एकलहरे या ठिकाणी हा भीषण अपघात झाला. या अपघातातुन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद थोडक्यात बचावले आहेत.

Indian Passport: भारतात ‘या’ 3 रंगाचे पासपोर्ट वापरले जातात; जाणून घ्या प्रत्येक पासपोर्टचे महत्व

काय घडले नेमके?
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे बुधवारी पुण्यावरून जुन्नर येथे केंद्रीय सचिव दौऱ्यासाठी जात होते. यादरम्यान यावेळी मंचर शहर सोडल्यानंतर एकलहरे हद्दीत एका ट्रक चालकाने त्यांचे वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि गाडी त्यांच्या बाजूने दाबली. परंतु चालक दीपक शिंदे यांनी अपघात होऊ नये यासाठी ब्रेक दाबले. यात डिव्हायडरला धडकून पुढील डाव्या व उजव्या बाजूचे दोन्ही टायरचा स्फोट होऊन गाडी 30 फूट डिस्कवर घासत गेली. वाहन चालक शिंदे यांनी मोठ्या शिताफीने गाडी कंट्रोल केली.

Pune News : रात्री दरोडा घालण्याच्या तयारीत असताना शिवाजीनगर व डेक्कन पोलिसांकडून दरोडेखोरांना अटक

या अपघाताची (Ayush Prasad Accident) माहिती मिळताच मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर आणि इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आयुष प्रसाद यांच्या तब्येतीची विचारपूस केली. ही घटना घडली तेव्हा या वाहनामध्ये पोलीस,आयुष प्रसाद ,त्यांचे अंगरक्षक पोलीस हवालदार संजीव रामू पाटील प्रवास करत होते.

Share This News
error: Content is protected !!