श्रीनगर : वैष्णो देवीचा (Vaishno Devi) दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. यामध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात (Accident) झाला आहे. या भीषण अपघातात 10 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 16 जण जखमी झाले आहेत. यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
काय घडले नेमके?
ही बस उत्तर प्रदेशमधून वैष्णो देवीच्या दर्शनासाठी भाविकांना घेऊन जात होती. ही बस 75 प्रवाशांना घेऊन जात होती. यादरम्यान झज्जर जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर (Jammu-Srinagar National Highway) कोटलीजवळ ही बस दरीत कोसळली. या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन विभागाचे लोक तातडीने त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्याला सुरुवात केली.
https://twitter.com/ANI/status/1663376847017750528
या अपघातानंतर स्थानिक नागरिक सीआरपीएफ, पोलीस आणि लष्कराच्या पथकांनीही घटनास्थळी दाखल होऊन प्रवाशांची सुटका केली. तत्काळ अनेक रुग्णवाहिका बोलावून जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. तसेच अपघातग्रस्त बसला बाहेर काढण्यासाठी क्रेन बोलवण्यात आली.