Ratnagiri News

Ratnagiri News : धक्कादायक! मित्रांसोबत पोहायला जाणे आले अंगलट; 2 जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

340 0

रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये (Ratnagiri News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Ratnagiri News) मित्रांसोबत पोहायला जाणे 2 मित्रांच्या अंगलट आले आहे. चिपळूण मधील शिरगाव जवळच्या नदीवर पोहायला गेलेल्या दहा मुलांपैकी दोघेजण बुडाले आहेत. हे बुडालेले दोघेही दहावीचे विद्यार्थी होते. अतिक बेबल आणि अब्दुल लसने अशी मृत तरुणांची नावे आहेत. दोघेही चिपळूण मधील स्थानिक रहिवासी आहेत.

Suicide News : ऑनलाइन रमीमध्ये पैसे गमावल्याच्या नैराश्यातून तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Viral Video : मुसळधार पावसामुळे पूल गेला पाण्याखाली; Video आला समोर

डोहात बुडालेल्या मुलांना शोधण्यासाठी महाड मधून रेस्क्यू टीम चिपळूण मध्ये दाखल झाली आहे. सकाळपासून या दोन्ही (Ratnagiri News) मुलांचा शोध सुरू आहे. कॅमेरा पाण्यात टाकून शोधकार्य सुरू,तर काही ठिकाणी गळाचा वापर करुन या तरुणांचा शोध सुरु आहे. खोल पाण्यात दगडात एकाचा मृतदेह अडकल्याचे समोर आले आहे. मात्र बाहेर काढताना त्यामध्ये खूप अडचणी येत आहेत तर दुसऱ्या तरुणाचा मृतदेह अद्याप मिळाला नसून त्याचा शोध सुरु आहे.

Share This News
error: Content is protected !!