Electric Shock

Electric Shock : विजेचा शॉक लागून महावितरणच्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

5406 0

राजापूर : राजापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये विजेचा शॉक (Electric Shock) लागून एका तरुणाला आपला जीव (Electric Shock) गमवावा लागला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. संतोष रामचंद्र वरक (वय 28) रा. नाणार याचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे तो महावितरणचा कर्मचारी होता. भर बाजारपेठेत घडलेल्या या घटनेने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

या कर्मचाऱ्याच्या अपघाताची माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शहरातील नागरिकांनी राजापूर ग्रामीण रूग्णालयात धाव घेतली. सकाळी शहर बाजारपेठेत काम करीत असताना वरक याला वीजेचा धक्का बसून तो कोसळला. यात तो गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला अधिक उपचारासाठी राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide