Raiway Fire

Raiway Fire : दौंड स्थानकावर रेल्वेच्या बोगीला आग; Video आला समोर

468 0

पुणे : पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये दौंड रेल्वे स्थानकाच्या (Raiway Fire) प्लॅटफॉर्म क्रमांक सहाच्या बाजूला उभ्या असणाऱ्या यार्ड मधील साईडला उभ्या केलेल्या रेल्वेच्या रॅकमधील (Raiway Fire) एका बोगीला अचानक आग लागली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यामध्ये रेल्वे बोगीचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे.

Selfie : सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतला; 4 तरुणांचा दुर्दैवी अंत

काय घडले नेमके?
दौंड रेल्वे स्थानकाच्या (Raiway Fire) प्लॅटफॉर्म क्रमांक सहाच्या बाजूला उभ्या असणाऱ्या यार्ड मधील साईडला उभ्या केलेल्या रेल्वेच्या रॅकमधील एका बोगीला अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकले नाही. या आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली असून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

ST Bus : प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा ! आता रेल्वेप्रमाणेच एसटी बसचं लोकेशन करता येणार ट्रॅक

सध्या या ट्रेनला (Raiway Fire) लागलेली आग विझवतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या घटनेमुळे रेल्वेच्या सुरक्षा प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Share This News
error: Content is protected !!