Rape

लग्नापूर्वीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीचे महिलेसोबत धक्कादायक कृत्य

3777 0

राहुरी : देवळाली प्रवरा परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपीने एका गावात घरात घुसून 21 वर्षीय विवाहितेवर बलात्कार (Rape) केला आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात राहुरी पोलिस ठाण्यात (Rahuri Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुजित भाऊसाहेब लोंढे (रा. नरसाळी, ता. श्रीरामपूर) (Sujit Bhausaheb Londhe) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. आपल्यावर गुन्हा (Crime) दाखल झाल्याचे समजताच आरोपी फरार झाला आहे. पोलिसांकडून सध्या त्याचा शोध सुरू आहे.

काय घडले नेमके?
बुधवारी (ता.‌ 17) सकाळी साडेअकरा वाजता घरात पीडित महिला घरी एकटी असताना आरोपी लोंढे घरात घुसला.‌ त्याने दारू प्यायलेली होती. यानंतर पीडित महिलेने आरडाओरडा केल्यावर आरोपीने तिचे तोंड दाबले. यानंतर तुझे लग्नापूर्वीचे फोटो तुझ्या वडिलांना दाखवीन, अशी धमकी (threat) देऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.

यानंतर या महिलेचा पती येताच आरोपीने घटनास्थवरून पळ काढला. यानंतर पीडित महिलेने घडलेला सगळा प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे (Sub-Inspector of Police Charudatta Khonde) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!